Desh

आयसीसी वन-डे क्रमवारीत भारतीयांचे वर्चस्व कायम; फलंदाजीत विराट तर गोलंदाजीत बुमराह अव्वल

By PCB Author

July 30, 2018

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत आपले वर्चस्व कायम राखले आहे. आयसीसीने नुकतीच आपली सुधारित जागतिक क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत फलंदाजांमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपले पहिले स्थान अद्यापही कायम राखले आहे. याव्यतिरीक्त उप-कर्णधार रोहित शर्मा चौथ्या तर सलामीवीर शिखर धवन दहाव्या स्थानावर आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मात्र आपले स्थान गमवावे लागले आहे. इंग्लंडविरुद्ध वन-डे मालिकेत केलेल्या संथ खेळामुळे धोनी क्रमवारीत १५ व्या स्थानावर घसरला आहे.

दुसरीकडे पाकिस्तानच्या फखार झमानचही क्रमवारीतल स्थान सुधारल आहे. आपल्या आधीच्या क्रमवारीत तब्बल ८ अंकांनी सुधारणा करत फखार झमानने ७१३ गुणांसह १६ वे स्थान पटकावले आहे. गोलंदाजीतही भारतीय गोलंदाजांचा वरचष्मा पहायाल मिळतो आहे. भारताचा सध्याचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. तर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने ६ वे तर त्याचा साथीदार युझवेंद्र चहलने १० स्थान पटकावले आहे.