Desh

आयपीएल विजेता संघ होणार मालामाल; उपविजेत्या संघालाही मिळणार घसघशीत बक्षीस   

By PCB Author

May 12, 2019

हैदराबाद, दि. १२ (पीसीबी) –  हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्री क्रिकेट स्टेडियमवर  आज (रविवार) आयपीएलच्या बाराव्या मोसमाचा विजेता कोण ठरणार ? याकडे  क्रिकेटरसिकांच्या नजरा लागल्या आहेत.  मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये  आयपीएलची अंतिम लढत रंगणार आहे.

प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवत मुंबई आणि चेन्नईने  अंतिम फेरीत धडक  मारली आहे. आता आयपीएलचा चषक कोण उंचावणार  हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  तसेच जिंकणाऱ्या संघाला चषकासोबत बक्षीस म्हणून किती रक्कम मिळणार? उपविजेत्याला काय मिळणार?  हे प्रश्नदेखील  क्रिकेट रसिकांना  पडले  आहे.

आयपीएलमध्ये जो संघ विजेता होणार त्या संघाला तब्बल २० कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तर अंतिम सामन्यात हरणाऱ्या संघाला (उपविजेता) १२.५ कोटी रुपयांचे बक्षीस  मिळेल. त्यासोबत वेगवेगळ्या गटांमध्ये खेळाडूंनादेखील मोठी बक्षीसे दिली जाणार आहेत.

विजेता : २० कोटी रुपये

उपविजेता (रनर-अप) : १२.५ कोटी रुपये

ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणारा खेळाडू) :१० लाख रुपये

पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू) : १० लाख रुपये

मोस्ट वॅल्यूबल प्लेयर ऑफ द ईयर : १० लाख

इमर्जिंग प्लेयर ऑफ द सिजन : १० लाख

गेम चेंजर ऑफ द सिजन : १० लाख

परफेक्ट कॅच ऑफ द सिजन : १० लाख

स्टाइलिश प्लेयर ऑफ द सिजन : १० लाख

सुपर स्ट्राइकर ऑफ द सिजन : कार आणि चषक