आयकर आयुक्तपदाचा राजीनामा देऊन प्रीता हरित यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
524

मेरठ, दि. २१ (पीसीबी) – आयआरएस अधिकारी प्रीता हरित यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन   काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. प्रीता हरित मेरठ येथील आयकर विभागात विशेष आयुक्तपदी कार्यरत होत्या.

उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख राज बब्बर यांच्या उपस्थितीत प्रीता हरित यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. प्रीता यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. मुळच्या हरयाणाच्या असलेल्या प्रीता पूर्वीपासूनच दलितांच्या अधिकारांसाठी काम करत आहेत.

प्रीता हरित यांनी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून दलितांच्या  अधिकारासाठी  अभियान सुरू केले आहे.  १९८७ च्या बॅचच्या आयआरएस अधिकारी असलेल्या प्रीता हरित यांनी दनकौर येथे दलित महिलांवरील अत्याचारावर  आवाज उठवला  होता. याप्रकरणी त्यांनी सीबीआय चौकशीचीही मागणी केली होती.