आम्ही जिवंत आहोत, तोपर्यंत संघावर बंदी घालून दाखवा; उमा भारतींचे राहुल गांधींना आव्हान    

506

इंदूर, दि. १४ (पीसीबी) – राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ही एक राष्ट्रवादी विचारप्रणाली आहे. ती सर्वांच्या मनात आहे. त्यामुळेच संघ कधीही कार्यकर्त्यांची अधिकृत नोंदणी करत नाही. जोपर्यंत आम्ही जीवंत आहोत, संघ आमच्यामध्ये जिवंत राहील. त्यामुळे आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत, तोपर्यंत संघावर बंदी घालता येणार नाही, असे प्रत्युत्तर केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दिले.