“आम्ही जिथे जातो तिथे लोक स्वत: येतात” निवडणूक लढण्यासाठी लोकांच्या मागे फिरण्याचा काळ संपला

0
461

मुंबई, दि.२१ (पीसीबी) – एका जमान्यामध्ये भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी लोकांच्या मागे जावे लागायचे. पण तो काळ आता संपला आहे. आम्ही जिथे जातो तिथे लोक स्वत: येतात. पक्षात प्रवेश करण्यासाठी लोक आता स्वत: भाजपाचे झेंडे घेऊन येतात. सोबत फोटो काढतात असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ताकत कितीही असली तरी पक्ष विस्तार चालू राहिला पाहिजे. सगळयांनाच भाजपामध्ये यायचे आहे पण आम्ही ठराविक निवडून लोक घेत आहोत असे फडणवीस म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा जो कारभार चालू आहे. त्यामध्ये त्या पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना पुढचे २० ते २५ वर्ष स्वत:चे भविष्य दिसत नाही. राजकारण करायचे असेल तर भाजपा-मोदीसोबत आले पाहिजे असे त्यांना वाटते.

सर्वांना घेणं शक्य नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा ठराविक वेचून लोक घेत आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही मुक्त प्रवेश सुरु केला तर ७० टक्के लोक आमच्यासोबत असतील. कोणालाही तिथे रहायचे नाही. विरोधकांचे नेतृत्व आपले नेते, कार्यकर्त्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे असे फडणवीस म्हणाले.

नारायण राणेंबद्दल मुख्यमंत्री म्हणतात…

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांना पक्षात घेण्याचा प्रश्नच येत नाही. ते आमचेच खासदार आहेत. भाजपाच्या कोटयातून ते खासदार झाले आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नारायण राणेंच्या प्रश्नावर म्हणाले. ते इंडिया टुडे कॉनक्लेवमध्ये बोलत होते.

नारायण राणे त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन करणार असे म्हणत असले तर तो निर्णय शिवसेनेला विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करुन घेण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्राची वाट लावली असे तुम्ही म्हणता.