Maharashtra

आम्हाला मुख्यमंत्रिपद देण्याची भाजपाची तयारी नाही पण विरोधी पक्षात बसण्यासाठी भाजप तयार – शिवसेना

By PCB Author

November 11, 2019

मुंबई, दि.११(पीसीबी)महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींनी  वेग घेतला आहे. काल भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी असमर्थता दाखवल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेबाबत विचारणा केली होती. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

तुमची विरोधी पक्षात बसण्याची तयारी आहे पण आमच्यासोबत चर्चा करण्याची तुमची तयारी नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी म्हटलं. भाजपला सत्तास्थापनेसाठी ७२ तासांची मुदत दिली होती तर आम्हाला केवळ  २४ तासांची मुदत दिली आहे असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं. असं असलं तरी आम्हाला राज्यपालांविषयी तक्रार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे भारतातलेच पक्ष आहेत. त्यांच्याशी आमचे मतभेद आहेत पण ते काही देशद्रोही नाहीत असं संजय राऊत म्हणाले.

भाजपने काश्मीरमध्ये पीडीएफशी हातमिळवणी केली तेव्हा त्यांचे कुठे विचार सारखे होते पण ही आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रॅमच्या आधारावर एकत्र येणार आहोत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. सकाळी दहा वाजता ही मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं ही बैठक पार पडेल. या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह पक्षाचे अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित असतील. शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबतच्या भूमिकेबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.