Desh

आम्हाला अनारकलीची गरज नाही; आजम खान पुत्राचे जयाप्रदाविषयी वादग्रस्त विधान

By PCB Author

April 22, 2019

रामपूर, दि. २२ (पीसीबी) – उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या  उमेदवार जया प्रदा यांच्यावर समाजवादी पक्षाचे  नेते आजम खान यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यांचे पुत्र अब्दुल्ला आजम खान यांनी देखील जया प्रदा यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे.  रामपूरमधील प्रचारात अब्दुल्ला खान यांनी  जया प्रदा याच्या संदर्भात बोलताना आम्हाला अली आणि बजरंगबलीची गरज आहे. अनारकलीची नाही,’ असे वादग्रस्त विधान केले आहे.  

या पूर्वी आझम खान यांनीही  जयाप्रदा अभिनेत्री असल्याने त्यांचा ‘नाचने-गानेवाली’ असा उल्लेख केला होता. आता त्यांच्या मुलाने त्यांना अनारकली असे म्हटल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

रामपूरमधील प्रचारसभेत बोलताना  अब्दुल्ला म्हणाले की,  सध्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची प्रतिमा धोक्यात आली आहे.  हे लक्षात घेता मी कुठेही थांबत नाही. आमचे काय होईल. लोकांनी देशाची राज्यघटना आणि घटनात्मक संस्थांचे संरक्षण करावे, असे आवाहन मी लोकांना करतो.