आमदार महेश लांडगे यांना नोटीस, लाडू वाटपाला बंदी

0
442

– श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रामभक्तांमध्ये नाराजीचा सूर

पिंपरी, दि. ५  (पीसीबी) – अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आनंदोत्सव साजरा करीत पिंपरी- चिंचवडमध्ये १० लाख लाडू वाटप करण्याच्या उपक्रमाचे आयोजन करणारे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

विशेष म्हणजे,  श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळा अयोध्येत आज (५ ऑगस्ट) होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलीस प्रशासनाने महाराष्ट्रातील भाजपच्या आमदारांमध्ये पहिली नोटीस भोसरीचे आमदार आणि पिंपरी- चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांना बजावली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो असल्याने अशा परिस्थितीत लाडू वाटप करणे योग्य होणार नाही म्हणून लाडू वाटप करु नये असे पोलिसांनी नोटीस मध्ये म्हटले आहे.

आमादार लांडगे यांनी मंदिराच्या भुमिपूजना निमित्त भोसरी मतदारसंघात दिवाळी साजरी करण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी जोरदार तयारी केली होती. प्रत्येक घात लाडू वाटप करायचे म्हणून भोसरी येथील एका मंगल कार्यालयात १० लाख लाडू तयार करण्याचे काम सुरू होते. त्याशिवाय या मतदारसंघातील सर्व देवळांवर विद्यात रोषणाई, घरांवर गुढी तसेच अंगणात दिवे लावून मंदिराच्या भुमिपूजन सोहळ्याचे स्वागत करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.

लाडू वाटप उपक्रमाचे मुख्य संयोजक कार्तिक लांडगे म्हणाले, कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन लाडू तयार करताना पुरेपूर काळजी घेतली आहे. आचारी, महिला यांना हॅन्डग्लोव्हज वापरूनच लाडू बांधले आहेत. त्याशिवाय लाडू वाटप करताना कुठेही सोशल डिस्टंन्सिंगचा भंग होणार नाही याचेही नियोजन केलेले आहे. सर्व प्रभागांतून नगरसेवक व कार्यकर्ते यांच्या मार्फत घरघरात लाडूचा प्रसाद पोहचेल, अशी व्यवस्था लावली आहे.