आमदार महेश लांडगेंसह बंधुंना यावर्षीचा ‘श्रावणबाळ पुरस्कार’जाहीर

0
447

– प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार पुरस्कार वितरण सोहळा
– ‘दावडी ते रामधाम’पुस्तक प्रकाशन समारंभाचे निमित्त

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) -‘‘मातृ देवो भव: पितृ देवो भव: ’’ या भावनेतून आई-वडीलांप्रति अपार श्रद्धा असलेले भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्यासह त्यांना बंधुंना यावर्षीचा ‘श्रावणबाळ पुरस्कार’जाहीर झाला आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे गुरूवारी सायंकाळी ५ वाजता जागतिक आनंदाची शाळा व संस्मृती प्रकाशन तर्फे “दावडी ते रामधाम” हे पुस्तक आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते प्रकाशित केले जाणार आहे.

प्रकाशक विनय सातपुते यांनी त्यांचे वडील सैनिक रामभाऊ सातपुते यांचा चरित्रग्रंथ शब्दांकीत केला आहे. मुलांनी आपल्या आई वडीलांवर चरित्रग्रंथ लिहावा व त्यांची शेवट पर्यंत सुश्रुषा करावी हा विचार समाजापर्यंत पोहचविण्यासाठी पुस्तक प्रकाशना बरोबर ” श्रावणबाळ पुरस्कार” देणायत येणार आहे.

समाज जागृतीसाठी देण्यात येणार्या नाविन्यपूर्ण पुरस्काराचे २०२२ चे मानकरी म्हणून आमदार महेश लांडगे व त्याचें दोन्ही सचिन लांडगे व कार्तिक लांडगे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच, या कार्यक्रमात ह.भ.प. दिगंबर महाराज ढोकले यांची प्रवचन सेवा आहे. पंडित हरीप्रसाद चौरासिया यांचे शिष्य समृध्द कुटे याच्या सुरेल बासरी वादनाने कार्यक्रमाची रंगत वाढणार आहे. त्याला तबला साथ शंतनु देशमुख देणार आहेत, अशी माहिती विनय सातपुते यांनी दिली.