Maharashtra

आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल

By PCB Author

September 22, 2019

सोलापूर, दि.२२ (पीसीबी) – महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक ही एकाच टप्प्यात होणार आहेत. त्या २१ ऑक्टोबरला तर मतमोजणी २४ ऑक्टोबरला होणार आहे. तसेच दोनही राज्यात आचारसंहिता जाहीर झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिंदे यांनी मतदारांना मेकअप बॉक्स वाटल्याची तक्रार माजी आमदार नरसय्या आडम यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. त्यामुळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नरसय्या आडम यांनी निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू होण्याची घोषण केली असतानाही, प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्ते दुपारी साडेबारा वाजता सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात मेकअप बॉक्स वाटत होत्या असा आरोप केला आहे. त्यामुळे मतदारांना मेकअप बॉक्स देऊन आचारसंहिता भंग केल्याची तक्रार आडम यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली.