Chinchwad

‘आमदार चषक कब्बडी’ स्पर्धेत माध्यमिक विद्यालय, थेरगाव ने पटकाविले विजेतेपद

By PCB Author

February 21, 2021

चिंचवड, दि.२१ (पीसीबी) : मा.श्री लक्ष्मणभाऊ जगताप (आमदार चिंचवड विधानसभा मतदार संघ) यांच्या वाढदिवसानिमित शिक्षण समितीच्या सभापती सौ. मनिषा प्रमोद पवार यांनी दि. १५/०२/२०२१ ते १६/०२/२०२१ दरम्यान कै.यशवंतराव चव्हाण शिक्षण संकुलाच्या मैदानावर श्री.लक्ष्मणभाऊ जगताप कबड्डी चषक व चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते.सदर स्पर्धेचा उदघाटन सोहळा दि १५/०२/२०२१ रोजी सकाळी ९ वाजता श्री शंकरशेठ जगताप (मा. नगर मदस्य व उद्योगपती) यांच्या शुभहस्ते झाले.

दरम्यान पी.सी.एम.सी च्या माध्यमिक विद्यालय थेरगावच्या राज्य व राष्ट्रीय कब्बडी विजेत्या संघातील खेळाडू व क्रिडा मार्गदर्शक श्री.बन्सी आटवे (किडाशिक्षक) सौ.सोनाली जाधव (सह शिक्षिका) अशा एकूण २६ जणांचा सत्कार सन्मानाचिन्ह व ट्रॅकसुट्स व किट्स देऊन मा.शंकरशेठ जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कब्बडी स्पर्धेचा मुलींचा अंतिम सामना पिंपरी चिंचवड म.न.पा.चे माध्यमिक विद्यालय थेरगाव व राजमाता न्यू.कॉलेज भोसरी यांच्यात झाला. सदर सामना माध्यमिक विद्यालय थेरगाव १७ -१० अशा ३ फरकाने जिंकला. सदर सामन्यात अष्टपैलू खेळाडूचा मान कु. भूमिका गोरे, उत्कृष्ट चढ़ाईचा मान मनीषा राठोड तर उत्कृष्ट पकडीचा मान सिका वस्ताद यांनी पटकाविला. मुलांचा अंतिम सामना पि.स.एम.सी माध्यमिक विद्यालय थेरगाव विरुद्ध क्रिडा प्रबोधिनी पि.सी.एम.सी असा झाला. सदर सामना क्रीडा प्रबोधिनी पि.सी.एम.सी. ने २७-१३ अशा १४ गुणांच्या फरकाने जिंकला. मुलांच्या अष्टपैलू खेळाडूचा मान आर्यन राठोड (मा.वि. थेरगाव) उत्कृष्ट पकड़ शुभरकांत दास (क्रिडा प्रबो.) व उत्कृष्ट चढाईचा मान यश काटे (राजमाता- भोसरी) यांनी पटकाविला.