Maharashtra

‘आमच्या दोन मोठ्या नेत्यांच एका पाठोपाठ अस अचानक जाणे हा आमच्यासाठी एक वज्राघात’ – नितीन गडकरी

By PCB Author

August 24, 2019

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात  अखेरचा श्वास घेतला. जेटली यांना ९ ऑगस्टला एम्समध्ये भरती करण्यात आले होते.  गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते . मात्र आज अरुण जेटली यांनी अखेरचा श्वास घेतला.  अरुण जेटली यांच्या निधन वार्तेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भावूक प्रतिक्रिया दिली आहे.

निशब्द हूं, अरुण जी को मेरी भावभीनी श्रद्धांजलि। देश को उनकी कमी हमेशा खलेगी। राज्यसभा में पक्ष और विपक्ष में रहते उनके दिए भाषण हमेशा चिरन्तन रहेंगे।

— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 24, 2019

आमच्या दोन मोठ्या नेत्यांच एका पाठोपाठ अस अचानक जाणं हा आमच्यासाठी एक वज्राघात आहे. अरुण जेटली यांच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली आहे. तर देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील भावूक झाले आहेत. अरुण जेटली यांच्या जाण्यान माझ वैयक्तिक नुकसान झाल आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.