Chinchwad

आमच्याकडे काय पाहतोयस म्हणत ‘त्यांनी’ तरुणाचे डोके फोडले

By PCB Author

January 24, 2021

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – टेलरच्या दुकानात बोलत थांबलेल्या तरुणाला तीन जणांनी मिळून ‘आमच्याकडे रोखून का पाहतोस’ असे म्हणत मारहाण केली. तरुणाच्या डोक्यात दगडाने मारून त्याला जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 22) रात्री सव्वानऊ वाजता दत्तनगर, चिंचवड येथे घडली.

गणेश परशुराम शिंदे (वय 20, रा. दत्तनगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोन्या कांबळे, दादा शिंदे, राहुल कांबळे (तिघे रा. दत्तनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराजवळ असलेल्या सचिन टेलर यांच्या दुकानात पॅन्ट शिवण्यासाठी जखमी गणेश शिंदे गेले होते. त्यावेळी आरोपी तिघे तिथे आले. त्यांनी ‘आमच्याकडे रोखून का पाहतोस’ असे म्हटले. आरोपी सोन्या आणि दादा यांनी हाताने मारहाण केली. तर राहुल याने बाजूला पडलेला दगड जखमी गणेश यांच्या डोक्यात मारला. त्यात गणेश जखमी झाले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.