आमचे सरकार आल्यास जुन्या नोटा बदलून देणार – प्रकाश आंबेडकर

0
713

नांदेड, दि. ४ (पीसीबी) –  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सत्तेवर आल्यास जुन्या नोटा बदलून देण्याचे आश्वासन दिले आहे. भाजप सरकार व्यापाऱ्यांना धमकावून भाजपचा प्रचार करण्यास सांगत आहे, असा आरोपही आंबेडकर यांनी  नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे प्रचारसभेत केला.

हिंगोली लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आंबेडकर आले होते. यावेळी ते बोलताना म्हणाले की, नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांचे  कंबरडे मोडले असून अनेक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. व्यापाऱ्यांकडे अद्याप जुन्या नोटा आहेत, आमचे सरकार आल्यास  जुन्या नोटा बदलून देण्यात येतील, असे ते म्हणाले.

दरम्यान, असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर राज्यातील सर्व ४८ जागा लढवणार आहेत. केवळ औरंगाबादच्या जागेवर एमआयएमचे इम्तियाज जलिल निवडणूक लढवतील, उर्वरित जागा वंचित बहुजन आघाडी लढवणार आहे.  प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोला या दोन  मतदारसंघातून  निवडणूक लढवणार आहेत.