Desh

आपल्या पत्नीचा सन्मान करत नाही, ते देशाचा सन्मान काय करणार?; ममता बॅनर्जींचा मोदींना टोला  

By PCB Author

April 29, 2019

कोलकाता, दि. २९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज (सोमवार) मतदान होत आहे. तत्पूर्वी झालेल्या प्रचारसभांमधून पंतप्रधान मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. जे आपल्या पत्नीचा सन्मान करत नाही, ते देशाचा सन्मान काय करणार,  असा टोला ममता बनर्जी यांनी  मोदी यांना लगावला आहे. 

मिदानपूर जिल्ह्यात आयोजित प्रचार सभेत ममता बनर्जी यांनी मोदींवर घणाघाती टीका केली. पंतप्रधान मोदी यांचे भाषण उद्धट आणि लज्जास्पद आहे, अशा शब्दांत बनर्जी यांनी मोदीवर हल्ला चढवला.

दरम्यान, ममता बनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर  याआधीही व्यक्तिगत टीका केली आहे. याआधी देखील त्यांनी, पंतप्रधानांनी स्वत:च्या कुटुंबाची कधीच काळजी केली नाही? त्यामुळे आई, मुलगी आणि बहिण काय असते हे तुम्हाला काय कळणार, अशा शब्दांत बनर्जी यांनी मोदींवर निशाणा साधला होता.