Maharashtra

आपल्यासाठी कुणीही मोर्चे, आंदोलने करू नये इंदुरीकर महाराजांच आवाहन

By PCB Author

February 17, 2020

नगर, दि.१७ (पीसीबी) – मुलगा-मुलगीच्या जन्माबाबत वक्तव्य केल्यामुळे वादात अडकलेले लोकप्रिय कीर्तनकार निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांच्या समर्थनार्थही आता लोक पुढे येऊ लागले आहेत. त्यांच्यासाठी आंदोलने करण्याची चाहत्यांची तयारी सुरू आहे. मात्र, खुद्द इंदुरीकर महाराजांनी चाहत्यांना त्यापासून रोखले आहे. आपल्यासाठी कुणीही मोर्चे, आंदोलने करू नये, असे आवाहन त्यांनी पत्रकाद्वारे केले आहे.