‘आपल्याला आपले राज्य, आपला जिल्हा वाचवायचा असेल तर कृपा करून सर्वांनीच नियमांचे पालन करा – जयंत पाटील

0
535

 

मुंबई, दि.५ (पीसीबी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते फेसबुक लाईव्हद्वारे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, ‘सर्वत्र निर्णयांचे पालन केले जात आहे. सांगलीच्या मिरज येथे विशेष कोरोना रुग्णालय स्थापन केले गेले आहे. ज्यात जास्तीच्या व्हेंटिलेटरची सुविधा केली गेली आहे,’ अशी माहिती पाटील यांनी दिली.

मागील आठवड्यात सांगलीच्या इस्लामपूरात कोरोनाचे २५ रुग्ण आढळले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ प्रशासनाला योग्य निर्देश देत परिस्थिती आटोक्यात आणली. सांगली जिल्हा प्रशासन सर्व गोष्टींची काळजी घेत आहे, असे पाटिल यांनी सांगितले

‘परिस्थितीची भीषणता लक्षात येताच तात्काळ गरज असलेल्या सर्व उपाययोजना केल्या. यामुळे इस्लामपूरात कोरोनामुळे सुरुवातीला जितके रुग्ण आढळून आले आता तसे रुग्ण वाढणार नाहीत, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

‘आपल्याला आपले राज्य, आपला जिल्हा वाचवायचा असेल तर कृपा करून सर्वांनीच नियमांचे पालन करा. सोशल डिस्टन्सींगचे पालन करा असे पाटील म्हणाले.