आपल्याकडे लोकांना सध्या वेगळाच नाद लागलाय – धनंजय मुंडे

0
456

बीड,दि.२२(पीसीबी) – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी “आपल्याकडे लोकांना सध्या वेगळाच नाद लागलाय. तो नाद जरा पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाकडे वळवा” असा सल्ला परळीतील शेतकऱ्यांना दिला आहे. ते परळीतल्या विभागीय पशु प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

धनंजय मुंडे यांनी, पशुधन सांभाळण्यासाठी नाद लागतो. मात्र आपल्याकडे लोकांना पशुधनाचा कमी आणि नको त्या कामांचा जास्त नाद आहे, असं म्हटलं आहे. आपण फक्त खिश्यात हात घालून पशु प्रदर्शनाला लोकांचे पशुधन बघत फिरतो. मात्र आपलं एकही पशुधन यात सहभागी नसतं. कारण आपल्याला जरा वेगळा नाद लागलाय, असं धनंजय मुंडें यांनी म्हटलंय.

दरम्यान, माझी अपेक्षा आहे की पुढच्या वर्षीच्या पशु प्रदर्शनामध्ये आपल्या तालुक्यातील एखाद्या चांगल्या बैलजोडीला, गायीला, म्हशीला, शेळीला कुठलंतरी एक पारितोषिक मिळेल. याची जबाबदारी तुम्ही घ्याल तरच खऱ्या अर्थाने आम्ही आयोजित केलेले एवढे मोठे कार्यक्रम सार्थकी ठरतील, असं धनंजय मुंडे म्हणाले.