Maharashtra

आपण कोण आहोत हे माहितीये का? दिवाकर रावतेंनी दिला कर्मचाऱ्यांना दम

By PCB Author

October 17, 2019

वर्ध्या, दि. १७ (पीसीबी) – वाहनाजवळ कॅमेरा फिरवत  तपासणी सुरू असताना  आपण कोण आहोत हे माहितीये का? असा सवाल करून शिवसेना नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कर्मचाऱ्यांना दम दिला.  यावेळी संतापलेल्या रावते यांनी आपल्या गाडीतील काही बॅगाही बाहेर भिरकावल्या.

रावते यांच्या गाडीची वर्ध्यातील पूलगाव या ठिकाणी तपासणी करण्यात आली. मात्र, यानंतर रावते आणि तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली

रावते वर्ध्यातील पूलगावमध्ये एका सभेसाठी  गेले होते. यावेळनी स्थिर तपासणी पथकाकडून वाहनांची तपासणी केली जात होती. इतर वाहनांप्रमाणे  रावते यांच्या वाहनाचीदेखील तपासणी करण्यात आली. परंतु वाहनाजवळ कॅमेरा फिरवत त्याची तपासणी सुरू असताना रावते संतापले आणि आपण कोण आहोत हे माहितीये का? असा सवाल करून कर्मचाऱ्यांना दम दिला.

या वादानंतर ही बाब निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिसांना कळवण्यात आली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या गाडीची तपासणी करून गाडी सोडली. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून गैरसमजातून हा वाद झाल्याची सारवासारव आता कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.