Maharashtra

आपण अजूनही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात – अर्जुन खोतकर

By PCB Author

March 14, 2019

जालना, दि. १४ (पीसीबी) – आपण अजूनही निवडणुकीच्या रिंगणात  आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास लोकसभा लढवणार  आहे, असे दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे.

खोतकर यांनी जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे भाजपची डोकेदुखी झाली आहे. तर खोतकर यांनी  बुधवारी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दानवे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या त्रासाचा पाढा वाचला होता.

त्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि रावसाहेब दानवे भेटायला येणार आहेत. त्या वेळी यावर निर्णय घेऊ, असे ठाकरे यांनी खोतकर यांना सांगितले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढण्यास आपण तयार आहे. उद्धव ठाकरेंचा जो निर्णय असेल, तो आपल्याला मान्य असेल, असे खोतकर म्हणाले.