आपको हमारी भी उम्र लग जावे! लालूंच्या वाढदिवशी राबडी देवींच्या खास शुभेच्छा

0
453

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी मंगळवारी अर्थात ११ जून रोजी वयाची ७१ वर्षे पूर्ण केली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाटणा येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयात कार्यकर्त्यांनी ७२ पाउंडचा केक कापून आनंद साजरा केला. तर, बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनीही ट्विटरद्वारे लालूंना शुभेच्छा दिल्या.

लालूंना शुभेच्छा देताना राबडी देवींनी, ‘प्राणप्रिय आदरणीय श्री लालू जी को ७२वें अवतरण दिवस की अनंत बधाईयाँ. आपको हमारी भी उम्र लग जावे’ असे ट्विट केले. या ट्विटसोबतच त्यांनी लालूंना गुलाबाचे फूल देत असतानाचा एक सुंदर फोटो शेअर केला. त्यांचे हे ट्विट नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस पडत आहे. अनेकांकडून त्यांच्या ट्विटला लाइक आणि रिट्विट केले जाते पण त्याचसोबत काही नेटकऱ्यांनी ट्रोल करण्याची संधीही सोडलेली नाही. ट्रोलर्सनी तो फोटो एडिट करुन राबडी देवी आणि लालूंच्या हातात गुलाबाच्या फुलाऐवजी चारा दाखवला आहे.

राजदचे सर्वेसर्वा आणि चारा घोटाळाप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेले लालू यादव सध्या रांचीतील रिम्स रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.