Maharashtra

आनंद महिंद्रा फॉर्मल कपडे न घालता केवळ बर्मुडा, शॉर्ट्स किंवा लुंगी घालूनच काम करत आहेत

By PCB Author

April 07, 2020

 

मुंबई, दि.७ (पीसीबी) – मोठमोठ्या कंपनीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून ते अगदी कारकून पदावरील काम करणारे कर्मचारी सारे वर्क फ्रॉम होम करण्याचे विविध उपाय शोधून काढत आहेत. अनेक लोक तर किती दिवसात फॉर्मल कपडे न घालता केवळ बर्मुडा, शॉर्ट्स किंवा लुंगी घालूनच काम करत आहेत. महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे देखील अशा प्रकारे काम करतात. त्यांनी स्वत:च याबाबतचे खास गुपित साऱ्यांना सांगितलले आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात ‘वर्क फ्रॉम होम’ करणारा एक कर्मचारी लुंगीवर काम करत आहे. याच फोटोचा आधार घेऊन महिंद्रा यांनी एक गुपित साऱ्यांशी शेअर केलं आहे. “एक मजेदार फोटो माझ्या व्हॉट्सअपवर आला आहे. हा फोटो पाहून मला एक कबुली द्यावीशी वाटते आहे. मी जेव्हा घरात असतो, तेव्हा व्हिडीओ कॉलवर बोलताना बऱ्याचदा मी लुंगी आणि वर शर्ट घातलेला असतो. मला मिटिंग सुरू असताना उभे राहायचे नसतं, त्यामुळे तसे करणे चालून जाते. पण आता मला भीती आहे की कदाचित पुढच्या वेळेपासून मला माझे सहकारी व्हिडीओ कॉलदरम्यान उभे राहायला सांगतील”, असे ट्विट महिंद्रा यांनी केले.

आनंद महिंद्रा यांच्या या साधेपणामुळे त्यांनी पुन्हा एकदा नेटिझन्सची मने जिंकली आहेत.

On a lighter note, this is from my #whatsappwonderbox. And I have a confession to make:On some Video Calls from home, I DID wear a lungi under my shirt. Didn’t have to stand up at any point during the meetings, but I suspect my colleagues may ask me to do so after this tweet! pic.twitter.com/e1IElefNaa

— anand mahindra (@anandmahindra) April 5, 2020