Maharashtra

आधी तिकीट मिळवायला पैसे द्या आणि जिंकल्यावर यांची भांडी पण घासा – निलेश राणे

By PCB Author

November 20, 2019

मुंबई,दि.२०(पीसीबी) – शुक्रवारी होणाऱ्या बैठकीला येताना आपलं ओळखपत्र म्हणून आधारकार्ड किंवा पॅनकार्ड आणि पाच दिवसांचे कपडे घेऊन येण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिले आहेत. यावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली आहे.

निलेश राणे काही दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. त्यांनी ट्विट करुन पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.

शिवसेना आमदारांना 5 दिवसाचे कपडे व आधार कार्ड आणायला सांगितलं आहे. अशी वागणूक आपण नोकरांना देखील देत नाही. शिवसेना आमदार हे स्व. बाळासाहेबांच्या नावावर व स्वतःच्या जीवावर निवडून आले आहेत उद्धव ठाकरेच्या नाही. आधी तिकीट मिळवायला पैसे द्या आणि जिंकल्यावर यांची भांडी पण घासा, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.