आधी आपल्या कुटुंबाला वाचवा; ओवैसींचा शरद पवारांना टोला

0
462

औरंगाबाद, दि. २ (पीसीबी) – राज्यात संविधान बचावच्या घोषणा देणाऱ्या लोकांनी आधी  आपल्या कुटुंबाला वाचवावे. संविधान वाचवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, अशा शब्दांत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आज (मंगळवार) येथे टोला लगावला.

औरंगाबाद येथे बहुजन वंचित आघाडीची पहिली जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. या आघाडीत भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम या दोन्ही पक्षांनी आघाडी केली आहे. या सभेला लाखो लोक उपस्थित होते.

यावेळी ओवैसी म्हणाले की, मोदी सरकारमुळे वंचित, बहुजन पीडीतांवर अन्याय केला आहे. मात्र, आता वंचित, दलित बहुजनांच्या एकीचं बळ दिसेल. राज्यघटना रा. स्व. संघ, मोदींनी दिलेली नाही, गांधी परिवार आणि पवारांनी दिलेली नाही. त्यामुळे त्यांनी संविधान बचावच्या घोषणा देऊ नयेत. आम्ही संविधान वाचवण्यासाठी सक्षम आहोत. त्यासाठी आपल्याला प्रकाश आंबेडकरांना साथ द्यायला हवी, असे ते म्हणाले.