Maharashtra

आधी अजित पवारांवर कारवाई करा, मगच आमच्या सदस्यांना निलंबित करा – जयसिंह मोहिते पाटील

By PCB Author

January 12, 2020

पंढरपूर,दि.१२(पीसीबी) – पक्षाविरोधात भूमिका घेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांवर पक्षाने कोणती कारवाई केली?, अडिच वर्षापूर्वी संजय शिंदे भाजपकडून जिल्हा परिषद अध्यक्ष होताना काय कारवाई केली?, दीपक साळुंखे यांचा पराभव करणाऱ्या राष्ट्रवादीटच्या सदस्यांवर कोणती कारवाई केली?, असे प्रश्न जयसिंह मोहिते यांनी राष्ट्रवादीला विचारले आहेत.

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसने ६ जिल्हा परिषद सदस्यांना निलंबित केलं. त्यावर मोहिते पाटील गट आक्रमक झाला आहे. आधी अजित पवारांवर कारवाई करा आणि मगच आमच्या सदस्यांना निलंबित करा, असं म्हणत जयसिंह मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीच्या कारवाईला उत्तर दिलं आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाच्या ६ सदस्यांनी भाजपला मतदान केलं. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी ही कारवाई केली.