Maharashtra

आधार कार्ड असेल तरच त्यांनाच या थाळीचा लाभ

By PCB Author

January 22, 2020

मुंबई, दि.२१ (पीसीबी) – राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजना २६ जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर लागू होणार आहे. राज्यातील गरीब नागरिकांसाठी ही योजना असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, आता राज्य सरकारने या शिवभोजन थाळीसाठी पुन्हा एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. शिवभोजनातील दहा रुपयांची थाळी तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला आधारकार्डची प्रत आणि एक फोटो द्यावा लागणार आहे. त्यामुळे आता ज्यांच्याकडे आधार कार्ड असेल तरच त्यांनाच या थाळीचा लाभ  मिळणार आहे.