‘आधार’च्या माध्यमातून नागरिकांवर टेहळणी करणे कठीण – सर्वोच्च न्यायालय

0
311

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – ‘आधार’च्या बाबतीत नागरिकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित राखण्यासाठी पुरेशी उपाययोजना आहे. तसेच ‘आधार’च्या माध्यमातून नागरिकांवर टेहळणी करणे अत्यंत कठीण काम आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) नोंदवले आहे. यामुळे ‘आधार’च्या माध्यमातून नागरिकांच्या खासगीपणाच्या अधिकारावर गदा येईल तसेच त्यांच्यावर नजर ठेवता येईल, असे केलेले दावे न्यायालयाने  फेटाळून लावले आहेत. ‘आधार’ कार्ड सुरक्षित असून यामुळे गरीबांना बळ मिळाले आहे. ‘आधार’ कार्ड सर्वसामान्यांची ओळख आहे, असेही न्यायालयाने  स्पष्टपणे नमूद केले आहे.