आद्य क्रांती गुरू लहुजी साळवे व क्रांतिकारक वासुदेव फडके स्मारकाचे नुतनिकरण १४ नोव्हेंबरच्या आत पूर्ण करा, नगरसेविका अनुराधा गोरखे यांची मागणी

0
681

पिंपरी, दि. 9 (पीसीबी): आद्य क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे व क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या चिंचवड स्टेशन येथील स्मारकाचे नूतनीकरणाच्या कामाला आज प्रत्यक्ष भेट दिली ,या कामाला मी स्वतः पाठपुरावा करून बजेट आणले व हे नूतनीकरणाचे काम वस्ताद लहुजी न च्या जयंती च्या दिवशी (१४ नोव्हेंबर) पूर्ण करावे असे आदेश आज प्रत्यक्ष भेटून अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे, कॉरोना मुळे हे काम गेल्या दोन वर्षा पासून रखडले होते त्याला सद्या गती देणे आवश्यक असल्याचे श्रीमती गोरखे यांनी म्हटले आहे,या बाबत लवकरच आयुक्तांना भेटून चर्चा करणार आहे.