आदित्य बिर्ला हाॅस्पिटलच्या हलगर्जीपणामुळेच नगरसेवक दत्ता साने यांचा मृत्यू , गणेश आहेर यांचा आरोप

0
718

पिंपरी,दि. 4 (पीसीबी) –आदित्य बिर्ला हाॅस्पिटल येथील भोंगळ कारभारामूळेच पिंपरी चिंचवड शहरातील खरा कोरोना योद्धा माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक दत्ता काका साने यांची हाॅस्पिटलच्या हलगर्हलगर्जीपणामुळे च मृत्यू झाला असल्याचा आरोप मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर यांनी प्रसिध्दी पञकाच्या माध्यमातून केला आहे. अशा हाॅस्पिटलवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी गणेश आहेर व संजय गायखे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कडे केली आहे.

महानगरपालिका आयुक्तांनी या दखल घेवून ह्या सर्व घटनेची चौकशी सूरू करावी, असे पत्रकात म्हटले आहे. या घटनेमुळे नागरिकांमधे संतापाची लाट आहे.
दोन दिवसापूर्वीच बिर्ला हाॅस्पिटल मधील एक व्हिडिओ प्रसिध्द देखील झाला होता. त्या ठिकाणी स्वतः कोरोना बाधित पेशंट स्वतः ऑक्सिजन गॅस सिलींडर घेवून फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर बिर्ला हाॅस्पिटल मधील नर्स संपावर गेल्या आहेत.
संजय गायखे यांनी या संदर्भात कालच एक पञ बिर्ला हाॅस्पिटल मधील आधिकारी डाॅक्टरांना देण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांना प्रवेश देण्यात आला नाही व पञ देखील स्वीकारण्यात आले नाही. अशा हाॅस्पिटलमधील आधिकारी डॉक्टरांवर कारवाई झालीच पाहिजे.