Maharashtra

आदित्य ठाकरेंबद्दल बोलताना दिशा म्हणते…

By PCB Author

June 13, 2019

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – बॉलिवूडमधील कलाकरांना जितकी प्रसिद्धी मिळते तितकेच त्यांना ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. नुकताच अभिनेत्री दिशा पटानीला आदित्य ठाकरेंसोबत पाहण्यात आले होते. या गोष्टीमुळे दिशाला भयंकर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या ट्रोलिंगमध्ये मुख्यतः टायगर श्रॉफचा उल्लेख होता. ‘एक था टायगर’पासून ते ‘टायगर जिंदा है’ अशा अनेक कंमेंट्स नेटकाऱ्यांनी केल्या आहेत. या सगळ्या ट्रोलिंगला दिशाने नीट उत्तर दिले आहे.

दिशाने चाहत्यांच्या या प्रश्नांना योग्य उत्तर दिले आहे. ती म्हणाली की, “मित्र जेवणासाठी एकत्र जाऊ शकत नाहीत का? मैत्री करताना आपण लिंगाचा विचार करत नाही. माझ्या फक्त मैत्रिणीच नाही तर मित्रही आहेत. प्रत्येकालाच मित्र व मैत्रिणीही असतात.” दिशा असेही म्हणाली की, मी असे करियर निवडले आहे की जिथे मी कायम लोकांच्या नजरेत राहणार आहे. लोक नेहमीच माझ्याबद्दल मते बनवणारच आहेत. त्यामुळे मी त्याकडे फर्डे लक्ष देत नाही.”

मुंबईतील एका हॉटेलबाहेर आदित्य ठाकरेंना पुन्हा एकदा अभिनेत्री दिशा पटानीसोबत स्पॉट करण्यात आले होते. ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘बागी २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेल्या दिशासोबत यापूर्वीदेखील आदित्य ठाकरे एका डिनरसाठी गेले होते. त्यावेळी त्यांची प्रचंड चर्चा झाली होती. दिशाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास ती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भारत’ या चित्रपटामध्ये झळकली होती. या चित्रपटामध्ये तिने एक महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारली होती.