आदित्य कुलकर्णी व मित्र परिवाराच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत

0
505

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – आदित्य कुलकर्णी व मित्र परिवार यांच्या वतीने पिंपरी- चिंचवड शहरातून  ७५०  किलो पेक्षा अधिक मदत पूरग्रस्तांसाठी जमा करण्यात आली. ही मदत  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती,  केंद्र सावरकर मंडळ येथे समितीचे प्रमुख विनोद देशपांडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.   

आदित्य कुलकर्णी यांनी शहरात १२ संकलन केंद्र नेमून दिले होते. शहरातील प्रत्येक भागात केंद्र होते.  पिंपरी वल्लभनगर , अजमेरा,  राहटणी, चिंचवड गाव, प्रेमलोक पार्क, यमुनानगर निगडी, चिखली गावठाण, घरकुल चिखली, संभाजीनगर, शाहूनगर, हिंजवडी,  मारुंजी -माण,  भोसरी ,  आकुर्डी दत्तवाडी  आदी भागात एक संकलन केंद्र होते.

शहरातील प्रत्येक भागात सोशल मीडियावरील मदतीच्या आवाहनाला  नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातून साधारण  ७५० किलोच्या वर मदत गोळा झाली.  कपडे, अन्नधान्य, औषध, दैनंदिन वापरातील  वस्तू, गोळा करण्यात आल्या.

या कामात  सुषमा वैद्य, प्रशांत कुलकर्णी, सोहन वैशंपायम, तपन इनामदार, सूरज देशमाने, मुकुंद कुलकर्णी, तेजस वाघोले,  श्रीनिवास कुलकर्णी, सुधीरकुमार अगरवाल, विजय जोशी, उज्वला केळकर, प्रसाद पाटील, शिरीष कुलकर्णी ,  नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे,  नगरसेविका कमल घोलप  व उद्योजक बापू घोलप  यांचे मोठे सहकार्य लाभले.