आदर्श : बकरीच्या आकाराचा केक कापून बकरी ईद साजरी

0
777

दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवी संघटनेशी संलग्न असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाने बकरी ईद निमित्त बकरीची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. आज (बुधवार) देशभरात बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधव बकरीची कुर्बानी देतात पण ती कुर्बानी देण्याऐवजी मुस्लिम राष्ट्रीय मंचाने बकरीच्या आकाराचा केक कापून बकरी ईद साजरी करण्याची ठरवले आहे.

गेल्या काही वर्षांपासून मुस्लिम राष्ट्रीय मंच कुर्बानी न देता बकरीच्या आकाराचा केक किंवा ज्या केकवर बकरीचे चित्र असेल असा केक कापून बकरी ईद साजरी करत आहे. ‘ अनेकजण बकरीची कुर्बानी देतात, पण मुक्या प्राण्याची कुर्बानी न घेता सगळ्यांनी वेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करावा’ अशी प्रतिक्रिया एका केक खरेदीदाराने दिली.

तसेच केरळमधे आलेल्या पुरामुळे तेथील नागरिकांना मदत म्हणून काही मुस्लीम बांधवांनी बोकड खरेदी करण्यासाठी लागणारे पैसे जमा करुन केरळ राज्यात मदतीसाठी पाठवले आहे.