आत्ताच सुरु झालेल्या १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला तात्पुरता पूर्णविराम; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं ‘हे’ कारण

0
1153

नवी दिल्ली, दि.११ (पीसीबी) : भारतात कोरोना लशींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून सध्या महाराष्ट्रासह इतर राज्यातील लसीकरण कार्यक्रमाला था पूर्णविराम लागला आहे. कारण, महाराष्ट्रात ४५ वर्षांपुढील आणि १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण सुरू आहे. परंतु, मागणीप्रमाणे लसीचा पुरवठा होत नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. कारण या वयोगटातील लसी ४५ वर्षांपुढील गटाच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती देत राज्यातील लस तुटवड्याची वस्तुस्थिती मांडली.

राज्यातील उपलब्ध लस आणि केंद्राकडून पुरवण्यात येणाऱ्या लशीच्या साठ्याची माहिती दिली टोपे यांनी दिली. ”१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीचं लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने ४५ वर्षांपुढील नागरिकांची जबाबदारी घेतली आहे. पण, राज्यात सध्या कोव्हॅक्सिनचे ३५ हजार डोस उपलब्ध आहेत,’ असं राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं.