Maharashtra

आता सीमोल्लंघन करण्याची वेळ, तयारीला लागा – खासदार उदयनराजे

By PCB Author

October 16, 2018

सातारा, दि. १६ (पीसीबी) – साताऱ्यातील जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ सीमोल्लंघन करण्याची आली आहे. त्याच्या  तयारी लागा, असे आवाहन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांना केले. जलमंदिर पॅलेस येथे सातारा विकास आघाडीची बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आदी  उपस्थित होते.

यावेळी  कार्यकर्त्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही विजयादशमी दिवशी सीमोल्लंघन मोठ्या धुमधडाक्यात साजरे करण्याचा आग्रह उदयनराजेंकडे केला. गावागावातून मोठ्या संख्येने लोक यावेत, यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे मत कार्यकर्त्यांनी  व्यक्त केले.

यावर उदयनराजेंनी स्मितहास्य करत अहो दरवर्षी मी असतोच, तुम्ही या म्हणजे झाले, नाहीतर आमचाच कार्यक्रम कराल, अशी मिश्किल टिप्पणी करून ते म्हणाले की,  मला कळतेय तुमच्या सर्वांची घालमेल का सुरु आहे. हो आता माझे इलेक्शन आले आहे. जनता माझ्या पाठीशी खंबीर आहे, तुम्ही ही रहा म्हणजे झाले. सीमोल्लंघन कार्यक्रमास सर्वांना येता आले पाहिजे, असे नियोजन करा, असे ते म्हणाले.