…आता ‘सामना’चे संपादक काय लिहितात हे मला पाहायचंय – अजित पवार

0
1834

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – शिवसेनेला मागे एकदा मी दुतोंडी गांडूळ म्हटले होते, यावर त्यांना काय राग आला होता. आता भाजपच्या मंत्र्यांनी भाजपला  दुतोंडी म्हटले आहे. या टीकेला ‘सामना’चे संपादक काय लिहितात हे मला पाहायचंय, असे राष्ट्रवादी काँग्रेस नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  म्हटले आहे.

मी शिवसेनेवर केलेल्या टीकेवर सामनामधून अग्रलेख लिहून माझ्यावर टीका करण्यात आली होती. मग आता भाजपाच्या मंत्र्याने केलेल्या टीकेवर यांचे संपादक काय लिहीतात हे पाहायचे आहे, असे अजित पवार यांनी ट्वीट करून ‘सामना’च्या संपादकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी बापाचे स्मारक बांधता येत नाही, आणि निघाले राममंदिर बांधायला, अशी शेलक्या शब्दांमध्ये टीका शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केली होती. या टीकेचा सामनाच्या अग्रलेखातून खरपूस समाचार घेतला होता. अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली होती. या अग्रलेखात अजित पवारांचे पुरते वस्त्रहरण करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा अजितदादांनी शिवसेनेला  डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.