आता शरद पवारांची भीती संपली आहे – शिवसेना

0
486

मुंबई, दि. २० (पीसीबी) – राष्ट्रवादीला गळती लागण्याचे सत्र कायम आहे. या गळतीला खिंडार, भगदाड असा  शब्दांही वापरता येत नाही, अशी उपरोधिक टीका शिवसेनेने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आदर  आहे, पण राजकारणातील त्यांच्याविषयीची भीती आता संपली आहे,  असा दावा शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात केला आहे.

राज्यात २०१४  मध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीच्या कावळ्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देत सरकार बनवण्याचे आमंत्रण दिले होते. हा चोंबडेपणा करण्याची त्यांना गरज नव्हती. शरद पवारांनी २०१४ साली जे केले, त्याचेच परिणाम त्यांचा पक्ष आता भोगतोय,’ असे अग्रलेखात म्हटले आहे.

जे कावळे राष्ट्रवादीतून उडाले त्यांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते,’ असा सवाल  अग्रलेखात केला आहे.  पवारांच्या पक्षाला लागलेली गळती हे त्यांच्या आजवरच्या धोरणाचे परिणाम आहेत’, असा उल्लेख करत शिवसेनेतून असे अनेक कावळे उडाले. मात्र उ़डाले ते कावळे, राहिले ते मावळे या मंत्रावर सेना उभी असल्याचा दावा यात करण्यात आला आहे.