आता राष्ट्रवादीवर आलेली वेळ उद्या शिवसेनेवरही येईल – जयंत पाटील

0
679

मुंबई, दि.२७ (पीसीबी) – राज्यातील विरोधकांना संपवण्यासाठी भाजप सरकारकडून  सरकारी यंत्रणांचा वापर सुरू आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस यात अडकली आहे. मात्र, उद्या शिवसेनेवरही हीच वेळ येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना पाटील म्हणाले की, आज राष्ट्रवादीवर आलेली वेळ उद्या शिवसेनेवरही येईल. आज आम्ही जात्यात आहोत, ते सुपात आहेत. मात्र, भविष्यात शिवसेनेलाही अशा संकटांचा सामना करावा लागेल, असे पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘ईडी’ला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दाखवली होती. परंतु, ईडीला शरद पवारांना काय प्रश्न विचारायचे हेच माहिती नव्हते. त्यांनी गृहपाठ न करता पवारांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये पवारांना गोवण्याचा भाजपचा डाव होता. मात्र, हा डाव उधळला गेला, असेही  पाटील यांनी सांगितले.