Desh

आता रामजन्मभूमी बाबरी मशीद वादग्रस्त प्रकरणाची जानेवारीत पुढील सुनावणी

By PCB Author

October 29, 2018

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – रामजन्मभूमी बाबरी मशीद या वादग्रस्त प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवारी) तहकूब केली. या पुढची सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये होईल, याची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.  

मशीद हा इस्लामचा अविभाज्य घटक नसल्याचे १९९४च्या निकालात स्पष्ट करण्यात आले होते. हा प्रश्न मोठ्या खंडपीठाकडे सोपवावा, अशी मागणी करण्यात आली होती, जी २७ सप्टेंबर रोजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने फेटाळली होती.  याचिकाकर्त्यांने या निकालावर मोठ्या घटनापीठाने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती

यावर मशीद हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही.  म्हणून इस्लाम पाळण्यासाठी मशीद हा आवश्यक भागच नाही, असा मोठा अर्थ त्यातून काढू नये, असेही निरीक्षण यावेळी सरन्यायाधीश दीपक मिश्रा व न्यायाधीश अशोक भूषण यांनी नोंदवले होते.या पार्श्वभूमीवर रामजन्मभूमी बाबरी मशीद जागेच्या मालकीप्रकरणी सर्वोच्च न्यायालय काय निकाल देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची सुनावणी पुढील वर्षी होणार आहे.  याच वर्षी लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यामुळे रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणाचे पडसाद उमटणार आहेत.