आता राज्यातही आमदारांच्या वेतनात एक वर्ष कपात; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

0
525

मुंबई,दि.९(पीसीबी) – राज्यातही आमदारांच्या एक वर्षापर्यंत वेतनात कपात करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय अन्य महत्वाचे निर्णयही या बैठकीत घेण्यात आले.

केंद्रानंतर आता राज्यातही सर्व विधिमंडळ सदस्य, लोकप्रतिनिधींच्या वेतनात ३० टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय झाला आहे.

त्यानुसार राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य, लोकप्रतिनिधींच्या वेतनात या महिन्यापासून म्हणजे एप्रिल २०२० पासून पुढील वर्षीपर्यंत म्हणजे एप्रिल २०२१ पर्यंत ३० टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय झाला. आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.