Desh

आता या राज्यातही राष्ट्रवादी- शिवसेना युती

By PCB Author

November 23, 2020

गोवा, दि. २३ (पीसीबी) – गोव्यात २०२२च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीप्रमाणे गोव्यातही भाजपाविरोधात आघाडी उभारण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. यासाठी शरद पवार यांना मध्यस्थीसाठी विचारणा करण्यात येणार आहे. शिवसेना नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिली. एनडीटीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.

केसरकर म्हणाले, “महाराष्ट्रातील महाविकास आघाडी प्रमाणे गोव्यात भाजपाविरोधी पक्षांची आघाडी तयार करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांना विचारणा करण्यात येईल. भाजपाने गोव्यातून प्रादेशिक पक्षांना संपवलं आहे. भाजपाच्या या भीषण वृत्तीला थांबवण्यासाठी भाजपाविरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. याद्वारे गोव्याला विभाजित करणारी धर्मनिरपेक्ष मतं वाचवली पाहिजेत.” उत्तर गोवा जो महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या जवळचा भाग आहे. या भागात शिवसेनेचं चांगलं स्थान आहे. याठिकाणी आगामी २०२२ मध्ये गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना दोन ते तीन जागा जिंकू शकते, असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला.