आता भाजपला गळती; भाजपचा हा माजी आमदार लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार

0
686

नागपूर, दि. १० (पीसीबी) – नागपुरातील भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. विजय घोडमारे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विजय घोडमारेंनी भेट घेतल्याची माहिती आहे. हिंगणा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. मात्र आता या मतदारसंघात भाजपने आपला झेंडा रोवला आहे. विजय घोडमारे हे २००९ मध्ये नागपूरमधील हिंगणा मतदारसंघातून आमदार होते. मात्र २०१४ मध्ये विजय घोडमारे यांची उमेदवारी नाकारली. त्यामुळे घोडमारे नाराज होते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पुन्हा तिकीट न मिळण्याची शक्यता असल्यामुळे विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न सुरु केल्याची चर्चा आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून हिंगणा मतदारसंघात उमेदवारी मिळावी, यासाठी घोडमारे प्रयत्न करत असल्याचे समजते.