आता पद्मश्री गल्लीतील कोणालाही मिळतो; सुधाकर गायधनींचे वादग्रस्त विधान

0
391

नागपूर, दि. १२ (पीसीबी) – ज्ञानपीठाचे पीठ खराब झाले आहे, त्यात अळ्या झाल्या आहेत. भालचंद्र नेमाडेंच्या सुमार कादंबरीला तो मिळतो. तर पद्मश्री गल्लीतील कोणालाही मिळतो,  असे वादग्रस्त विधान महाकवी सुधाकर गायधनी यांनी केले आहे.

नागपुरात ‘कब्रीतला समाधिस्थ’ या कवितासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा आज (सोमवार)  झाला.  या कार्यक्रमात   सुधाकर गायधनी बोलत होते.

गायधनी म्हणाले की, पद्मश्री गल्लीतील कुणालाही मिळतो. मलाही विचारणा झाली होती, पण मी पद्मभूषण मागितले, असे ते म्हणाले.

अनेकजण स्वतःला नामवंत कवी समजतात, पण कविता काय असते हे त्यांनाही कळत नाही. ती कविता विस्मृतीत जाते आणि कवी स्वर्गात जातो, असेही ते म्हणाले .