आता देशात लॉकडाऊनची शक्यता

0
353

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – वाढत्या कोरोना रूग्णांचा आकडा पाहता देशात लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

देशात कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत असली तरी व्यापक पातळीवर लॉकडाऊन लावण्याची केंद्र सरकारची कुठलीही योजना नाही आहे, असं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. आम्हाला अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प करायची नाही आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे आता संपूर्ण देश लॉक होणार नाही. तर कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर नियंत्रणासाठी विशेष पावले उचलली जातील. कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांना वेगळे ठेवण्याबाबत उपाय केले जातील. स्थानिक पातळीवरील उपायांमधून संकटाचा सामना केला जाईल. मात्र लॉकडाऊन लावलं जाणार नाही, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. यामध्ये महाराष्ट्राबरोबरच छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे.