आता तरी सु-सूत्रे योग्य नियोजन करा!! – आशिष शेलार

0
368

मुंबई,दि.७(पीसीबी) – आधी घोषणा, मग निर्णय, मग गृहपाठ यामुळे विद्यार्थ्यांना गेले तीन जो महिने मनस्ताप झाला. विद्यार्थी भयभीत आहेत त्यांना संभ्रमातून बाहेर काढा…आता तरी सु-सूत्रे योग्य नियोजन करा!! असं म्हणत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज्यसरकारवर टिका केली आहे.

देशातील विद्यार्थ्यांना नोकरी, उच्च शिक्षणात समान संधी मिळावी म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने “एकसूत्री”निर्णय घेतला. शैक्षणिक आरोग्या सोबत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करुन सप्टेंबर पर्यंत कालावधी वाढवून दिला. आता नोकरीच्या संधीत महाराष्ट्राचे विद्यार्थी मागे पडू नये. असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.

मा.मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे गाईडलाईनची मागणी पत्राने केली होती. आता राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही,याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. राज्य सरकारच्या निर्णयात कुलपती, कुलगुरूंना अनभिज्ञ ठेवून युजीसीच्या गाईडलाईन प्रमाणे तो निर्णय नव्हता हे स्पष्ट झाले! असंही त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, राज्य सरकार एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना नापास करणार होते? ते सुदैवाने आता बचावले. आधी घोषणा, मग निर्णय, मग गृहपाठ यामुळे जो विद्यार्थ्यांना गेले तीन महिने मनस्ताप झाला. विद्यार्थी भयभीत आहेत त्यांना संभ्रमातून बाहेर काढा…आता तरी सु-सूत्रे योग्य नियोजन करा!! अस आशिष शेलार म्हणाले आहेत.