Maharashtra

आता घरच्या घरीच आता कोरोनाची चाचणी होणार

By PCB Author

March 24, 2020

 

मुंबई, दि.२४ (पीसीबी) – कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि संपूर्ण प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. तसेच संशयित रुग्णांची कोविड-१९ चाचणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचे नवीन दूरध्वनी क्र मांक सुरू होत आहेत. ही सुविधा पुढील दोन दिवसांपासून सुरू होईल.

चाचणी नमुना घरी येऊन घेणे आणि तपासणीसाठी ICMR संस्थेने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेत पाठवणे यासाठी समन्वय करून देतील. त्यामुळे आता घरच्या घरीच आता कोरोनाची चाचणी होणार आहे.

कोरोना व्हायरस’ने राज्यात मोठ्या प्रमाणात हात पाय पसराला सुरुवात केली आहे. तसेच मुंबईत सर्वाधिक ४२ कोरोनाबाधित आहेत. तर, त्याखालोखाल पुणे आणि पिपरी चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून तिघेही मुंबईतील आहेत.