Banner News

आता केवळ ओळखपत्र दाखवून गॅस सिलेंडर घेऊन जा !

By PCB Author

December 03, 2018

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा निर्णय ‘इंडियन ऑइल’ने घेतला आहे. घरगुती गॅसचा ५ किलो वजनाचा सिलिंडर  मिळविण्यासाठी आता ओळखपत्र पुरेसे आहे. हा सिलेंडर  सहज उपलब्ध हो्ण्यासाठी केवळ ओळखपत्र दाखवणे गरजेचे आहे.  सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइलने  ग्राहकांसाठी खास योजना आणली आहे. त्यानुसार आता केवळ ओळखपत्र दाखवून गॅस ग्राहकांना देण्यात येणार आहे. त्यामुळे गॅस मिळविण्याच्या अनेक कटकटीतून ग्राहकांची सुटका होणार आहे.

याबाबत इंडियन ऑइल’च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या योजनेची माहिती दिली आहे. ग्राहकांना आपल्या शहरातील ‘इंडेन’च्या वितरकाकडून  ५ किलो स्वयंपाकाचा गॅस पैसे देऊन आणि ओळखपत्र दाखवून  घेता येणार आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत सिलिंडर प्राप्त झालेल्या ग्राहकांकडून पुन्हा सिलिंडर भरला जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने सामान्य ग्राहकांसाठी ही योजना सुरू केली आहे.

त्याचबरोबर १४ किलोचा गॅस सिलिंडर जमा करूनही ग्राहकांना ५ किलोचा गॅस सिलिंडर घेता येणार आहे. विनिमय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला आहे.तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यामुळे  घरगुती गॅसच्या दरात  घसरण झाली आहे. राजधानी नवी दिल्लीमध्ये विनाअनुदानित घरगुती सिलिंडर १३३.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे हजार रुपयांच्या जवळ पोहोचलेल्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर घसरून ८४६ रुपयांवर आला आहे.

दरम्यान, व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात २०२ रुपयांची घसरण झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे आता व्यावसायिक वापराच्या (१९ किलो) सिलिंडरची किंमत १४७६.५० रुपयांवर पोहोचली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात  घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक खुश झाला आहे.