Desh

आता काश्मीरमधील गोऱ्या मुलीशी कोणीही विवाह करू शकेल – भाजप आमदार

By PCB Author

August 07, 2019

मुजफ्फरनगर, दि. ७ (पीसीबी) – आता काश्मीरमधील गोऱ्या मुलीसोबत कोणीही विवाह करू शकेल, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार विक्रमसिंह सैनी जम्मू काश्मीरमधील ३७० कलम रद्द झाल्यानंतर केले आहे. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील खतौली विधानसभा मतदारसंघाचे सैनी हे आमदार आहेत. 

केंद्रातील भाजप सरकारने काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. काश्मीरमध्ये आता भारतातील इतर राज्यातील नागरिकांना व्यवहार करता येणार आहेत. यावरून भाजप आमदाराने केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आमदार विक्रमसिंह सैनी म्हणाले, की पक्षातील कार्यकर्ते सध्या आनंदात आहेत. कारण, त्यांना काश्मीरमधील गोऱ्या मुलींशी विवाह करता येणार आहे. पक्षातील अविवाहीत कार्यकर्त्यांची आता तेथे जाऊन लग्न करू शकतात. तेथील महिलांवर आगोदर खूप अत्याचार होत होते. आता तेथील मुलीने उत्तर प्रदेशातील कोणत्याही मुलासोबत लग्न केले तर तिचे तिकडचे नागरिकत्व रद्द होत होते. पण, आता काश्मीरमधील गोऱ्या मुलींनी आनंद साजरा करायला पाहिजे की त्यांना आता भारतातील कोणत्याही मुलाशी लग्न करता येणार आहे. मग तो हिंदू असो की मुस्लिम.