आता कमालच झाली प्रणिती शिंदेंची ! – सुभाष देशमुख

0
842

सोलापूर, दि. ३१ (पीसीबी) – आमदार प्रणिती शिंदे यांचे वडील मुख्यमंत्री असताना सोलापूर जिल्ह्यासाठी जितका आरोग्य निधी खर्च केला. त्यापेक्षा अधिक निधी मी माझ्या मतदारसंघात खर्च केला आहे. या लोकांना आमची कामे दिसत नाहीत का? असा सवाल करून आता कमालच झाली या प्रणिती शिंदेंची ! अशी टीका सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली.

सोलापूरात दोन मंत्री आहेत. मात्र, त्यांनी कवडीचाही निधी आणला नाही, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी एका कार्यक्रमात केली होती. या टीकेला देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले.

देशमुख पुढे म्हणाले की,  दहा कोटींचा निधी गोरगरिबांच्या आरोग्यावर खर्च केला आहे. तसेच सोलापूरचा समावेश स्मार्ट सिटीत केला आहे .उड्डाणपुलासाठी मुख्यमंत्र्यांनी २९० कोटी मंजूर केले आहेत.  पंतप्रधान  मोदी यांनी ३० हजार घरासाठी निधी मंजूर केला आहे . मग  इतकी कामे कोणी केली आहेत?  एक कवडीही दिलेली नाही, म्हणणे  सोपे काम असते.  बोलायला फार कष्ट लागत नसल्याची टीका  देशमुख यांनी शिंदे यांच्यावर केली.