आता इनकमिंग कॉल्ससाठी पैसे मोजावे लागणार

0
423

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – मोबाईलवरील मोफत इनकमिंग कॉल्स बंद  करण्याचा निर्णय दूरसंचार कंपन्यांनी घेतला आहे. फ्री इनकमिंग कॉल्ससाठी मोबाईलवर सर्वच ग्राहकांना  कमीतकमी रिचार्ज करावा लागणार आहे.  या रिचार्जसाठी कंपन्यांनी काही  नव्या योजना आणल्या आहेत. ग्राहकांना दर महिन्याला खास इनकमिंगसाठीचे प्लॅन्स कंपनीने तयार केलेले आहेत. त्यानुसार रिचार्ज करावे लागणार आहेत. या निर्णयामुळे आता केवळ इनकमिंगसाठी सिमकार्ड वापरणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.