Pune

आता आयटी कंपन्यांनाही परवानगी

By PCB Author

May 23, 2020

पुणे, दि. २३ (पीसीबी) : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील उद्योग व्यापार सुरू करम्याचे सरकारचे धोरण आहे. एमआयडीसी मधील कारखानदारी चारदिवसांपूर्वी सुरू झाली. आता पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून आयटी कंपन्या सुरु करण्याची परवानगी उद्योग विभागाने दिली आहे. ५० टक्के उपस्थितीत या कंपन्या सुरु करता येतील मात्र, त्यांना अटी आणि शर्तीनुसार पाळाव्या लागतील.

पुणे महापालिका हद्दीत केवळ अत्यावश्यक सेवा असलेल्या उद्योगांना परवानगी देण्यात आली होती. आता प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य ठिकाणच्या आयटी कंपन्यांनाही परवानगी देण्यात आली. पुणे शहरातील मगरपट्टा, नगर रस्ता, सोलापूर रस्ता, कोथरूड, चांदणी चौक, नांदेड सिटी, रामवाडी परिसर, डेक्कन, नळस्टॉप, पाषाण, बाणेरसह इतर विविध ठिकाणी आयटी कंपन्या आहेत.

काही अटी आणि शर्तीनुसार सोशल डिस्टन्सचे पालन करत कंपन्या सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पुणे शहरात साडे चारशे मोठे आणि १४०० लहान आयटी उद्योग आहेत. तर ७२ आयटी पार्क असून या कंपन्यांमध्ये साडेचार लाख कर्मचारी काम करतात. .